ती येणार...

फ़ुल स्टॉप नाही तर निदान कॉमा तरी…..
शब्द धरताहेत भोवताली फ़ेर
ती येणार.. जन्म घेणार म्हणून
लेखणी उतावीळ सळसळते आहे
ती येणार.. जन्म घेणार म्हणून
शुभ्र को-या कागदाचा कोरा वास
उर भरून घेतोय श्वास
समरस अर्थगंधात होण्यासाठी
ती येणार.. जन्म घेणार म्हणून
सारी तयारी झालीय..आता फ़क्त वाट
ती येणार.. जन्म घेणार म्हणून
मलाही येऊ घातल्यात कळा आतल्या आत
आत्ता फ़ुटेल वाचा…आत्ता होईल जन्म
एका नव्या कवितेचा…
पण…
दाबून ठेवल्यात त्या

0 comments:

Search

My Blog List